एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार संकटात आलंय. याघडीला शिंदे गटासोबत शिवसेनेचे ३९ आमदार आणि इतर अपक्ष मिळून ५१ आमदार आहेत. त्यामुळे या आमदारांनी पाठिंबा काढल्यानं राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार अल्पमतात असल्याचा दावा शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेत केलाय. दुसरीकडे शिंदे गटाच्या सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु असल्याचंही दिसतंय. भाजपासह इतर पर्याय ते तपासून पाहत असल्याचं बोललं जातंय. त्यासाठीच एकनाथ शिंदेंनी दोन वेळा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही फोन केल्याची माहिती आहे. यावरुनच शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदेंना ट्विटरवरुन एक सल्ला दिलाय, पण त्यात त्यांनी मनसेला खोचक टोलाही लगावलाय.